Breaking News

हुतात्मा पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता अभियान

पाली : प्रतिनिधी

हुतात्मा नाग्या महादू कातकरी पुण्यतिथीनिमित्त  सिद्धेश्वर आदिवासी वाडीतील महिलांनी स्वच्छता अभियान राबविले. हातात झाडू घेऊन या महिलांनी वाडीवरील सर्व परिसर स्वच्छ केला, तसेच ठिकठिकाणी वाढलेले गवत व झाडीझुडपे कापून टाकली. या वेळी महिलांची चांगली एकजूट पहायला मिळाली. हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांची पुण्यतिथी अशा विधायक प्रकारे साजरी केल्याबद्दल सरपंच उमेश यादव यांनी सर्व आदिवासी महिलांचे कौतुक केले.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रातील न्हावाशेवा टप्पा 3 पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागांना पाणीपुरवठा करणार्‍या न्हावाशेवा टप्पा 3 …

Leave a Reply