Breaking News

सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्येही रायगडात महाविकास आघाडीला तडे

शिवसेना स्वबळावर लढविणार- आमदार महेंद्र थोरवे

कर्जत : बातमीदार
रायगडचे पालकमंत्री हटावच्या मागणीनंतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थित शिवसेनेने बंड केले. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांत रायगडमध्ये मोठी फूट पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर आता रायगड जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्येही शिवसेनेने स्वबळावराचा नारा जाहीर केल्याने महाविकास आघाडीतील पक्षांत मोठी बिघाडी असल्याचेच बोलले जात आहे.
शिवसेना पक्षाने येऊ घातलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांंसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करत आता कोणत्याही प्रकारे कोणाशीही युती अथवा आघाडी न करता शिवसेना स्वबळावर या निवडणूकीला सामोर जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
कर्जत तालुक्यातील विविध विकास कार्यकारी सेवा संस्था यांच्या सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्या आहेत. त्यासाठी शिवसेना पक्षाची बैठक आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्ष या विशेष बैठकीसाठी उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, विधानसभा संघटक संतोष भोइर, तालुकाप्रमुख, तालुका संघटक शिवराम बदे, तालुका संपर्कप्रमुख सुदाम पवाळी, आणि ज्येष्ठ शिवसैनिक रमेश मते, माजी उपसभापती मनोहर थोरवे, उपतालुका प्रमुख दिलीप ताम्हाणे, भरत डोंगरे, अंकुश दाभणे, माजी सभापती राहुल विशे, तसेच रमेश कदम, सुरेश बोराडे, सुरेश गोमारे, सुधाकर देसाई, पूजा थोरवे,तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार थोरवे यांनी सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना कुणाशीही युती अथवा आघाडी न करता ही निवडणूक आपली पहिली प्रतिष्ठेची व ऐतिहासिक निवडणूक म्हणून लढवावी आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी गाफील न राहता विरोधकांची अनेक वर्षांची मक्तेदारी मोडीत काढा असे आवाहन केले. सहकार क्षेत्रातील विरोधकांची अनेक वर्षांची असलेली मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी शिवसेना या निवडणुकीच्या माध्यामातून खंबीरपणे सामोरे जात आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे यावेळी ही निवडणूक विरोधकांना सोपी राहिली नाही, म्हणूनच आपण या निवडणुकीत मोठा विजय संपादन करणार हा विश्वास महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply