पाली : प्रतिनिधी
हुतात्मा नाग्या महादू कातकरी पुण्यतिथीनिमित्त सिद्धेश्वर आदिवासी वाडीतील महिलांनी स्वच्छता अभियान राबविले. हातात झाडू घेऊन या महिलांनी वाडीवरील सर्व परिसर स्वच्छ केला, तसेच ठिकठिकाणी वाढलेले गवत व झाडीझुडपे कापून टाकली. या वेळी महिलांची चांगली एकजूट पहायला मिळाली. हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांची पुण्यतिथी अशा विधायक प्रकारे साजरी केल्याबद्दल सरपंच उमेश यादव यांनी सर्व आदिवासी महिलांचे कौतुक केले.