खारघरमधील रस्ते दुरुस्तीची संयुक्त सर्वेक्षण व्हावे

ब्रिजेश पटेल यांची मागणी

खारघर : रामप्रहर वृत्त

येथील खराब रस्ते व पावसाळ्यात पडणारे प्रचंड खड्डे याबाबत कार्यकारी अभियंता तात्यासाहेब अहिरे यांना खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली खारघर, तळोजा मंडलातील नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भेटून निवेदन दिले. संयुक्त सर्वेक्षण झाल्यास निकृष्ट दर्जाच्या कामांना आळा घातला जाईल, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.

2016 पासून पाठपुरावा केल्यावर खारघरमधील काही रस्त्यांचे रिसर्फेसिंग झाले, पण आज आपण या रस्त्यावरून फिरलात तर आपल्या लक्षात येईल की खड्डे सर्व ठिकाणी पडले आहेत. याबाबत अभियंत्यांना निवेदन देताना स्पष्ट करण्यात आले की, डांबरीकरण योग्य नसल्याने काही दिवसांतच रस्त्यांवर खड्डे पडतात. अशा वेळी संयुक्त सर्वेक्षण झाल्यास अशा निकृष्ट दर्जाच्या कामांना आळा घातला जाईल. पनवेल महानगरपालिकेच्या हस्तांतरणाचे कारण पुढे न करता पावसाळ्यानंतर सर्वेक्षण करून खराब रस्त्यांचे डांबरीकरण करून देण्यात यावे. श्री. अहिरे यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत पावसाळ्यानंतर या रस्त्यांचे डांबरीकरण करून घेऊ, असे आश्वासन दिले.पावसाळ्यानंतर संयुक्त सर्वेक्षण करून रस्त्यांचे उत्कृष्ट दर्जाचे डांबरीकरण सिडकोमार्फत करण्याचा भारतीय जनता पार्टी खारघर तळोजा मंडळाच्या नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी निश्चय केला आहे. तसे आश्वासन सिडको अधिकार्‍यांनीही दिले आहे.

या वेळी खारघर-तळोजा मंडलाचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यु पाटील, नगरसेवक प्रवीण पाटील, रामजी बेरा, हर्षदा उपाध्याय, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष संजय घरत, उपाध्यक्ष दिलीप जाधव, अमर उपाध्याय, सुमित सहाय आदी उपस्थित होते.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply