पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या नगरसेविका स्व. मुग्धा लोंढे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त येथील विरूपाक्ष मंगल कार्यालयात रविवारी (दि. 3) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास प्रतिसाद लाभला. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्व. मुग्धा लोंढे यांच्या प्रतिमेला वंदन करून रक्तदान केले.
जनहित संवर्धक मंडळ, कच्छ युवक संघ आणि युवानाद ढोल पथक यांच्या सहकार्याने झालेल्या या शिबिराची सुरुवात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी स्व. मुग्धा लोंढे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्ज्वलन करून झाली.
शिबिरास महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, मनपा महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेवक राजू सोनी, अजय बहिरा, नितीन पाटील, नगरसेविका चारुशीला घरत, रूचिता लोंढे तसेच गुरूनाथ लोंढे, अमित ओझे, चिन्मय समेळ आदी उपस्थित होते.
ज्यांनी कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी जास्तीत जास्त रक्तदान केले त्या नंदाजी ओझे, जनहित संवर्धक मंडळाचे सुहास सहस्रबुद्धे, युवानाद ढोल पथकाचे प्रथमेश सोमण, कच्छ युवक संघाचे धीरूभाई मारू यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …