Breaking News

सातार्यात नियतकालिकाचे प्रकाशन

सातारा : प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या शिवविजय 2020-21 या वार्षिक नियतकालिकाच्या अंकाचे प्रकाशन सोमवारी (दि. 4) ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व अ‍ॅड. रवींद्र पवार यांचे हस्ते करण्यात आले.

या वेळी ‘रयत’चे सचिव व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक विभागाचे सहसचिव संजय नागपुरे, कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. अनिल वावरे, डॉ. रामराजे देशमुख, डॉ. रोशनआरा शेख, ‘शिवविजय’चे संपादक डॉ. सुभाष वाघमारे, संस्कृत विभागप्रमुख डॉ. पोर्णिमा मोटे व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. या अंकाबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.

लोकनेते रामशेठ ठाकूर भवनच्या गार्डनमध्ये निसर्गाच्या सानिध्यात या अंकाचे प्रकाशन झाले. रयत शिक्षण संस्थेच्या 102व्या वर्धापन दिनाच्या दिवशी हा प्रकाशन समारंभ झाल्यामुळे समाधान वाटते, असे ‘शिवविजय’चे संपादक डॉ. सुभाष वाघमारे यांनी सांगितले.

Check Also

कामोठ्यातील ‘एल.के. विवांता’च्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा

मनपा लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे सेक्टर २२ येथील प्लॉट क्रमांक ७३/७४वर असलेल्या …

Leave a Reply