Breaking News

नवी मुंबईत दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई महापालिकेमार्फत देवी विसर्जनासाठी सुसज्ज ठेवण्यात आली होती. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्तही चोख होता. त्यामुळे सर्वच 22 मुख्य विसर्जनस्थळांवर घरगुती घट आणि घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या श्रीदुर्गामूर्ती अशा 864 दुर्गादेवींचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने झाले.

सर्वच 22 विसर्जनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने बॅरेकेटींग करण्यात आले होते. लाईफगार्डस्, स्वयंसेवक यांच्यासह अग्निशमन दल कार्यरत होते. मूर्तींच्या सुयोग्य विसर्जनासाठी  तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. त्याठिकाणी पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचाराची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली होती. दोन्ही परिमंडळाचे उपआयुक्त हे सर्व विभागांच्या सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांचे समवेत संपूर्ण स्थितीवर लक्ष ठेवून होते. 

सर्व विसर्जनस्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते व नागरिकांना त्याची माहिती देण्यात येत होती. एकूण 17 टन 565 किलो ओले निर्माल्य जमा करण्यात आले असून त्याची वाहतुक स्वतंत्र निर्माल्य वाहनाव्दारे करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त व अधिकारी याविषयी दक्ष होते. या निर्माल्याची विल्हेवाटही पावित्र्य जपत स्वतंत्रपणे लावली जात आहे. महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयांमार्फत करण्यात आलेली व्यवस्था आणि पोलीस विभागाची दक्ष नजर तसेच नागरिकांचे लाभलेले सहकार्य यामुळे श्रीदुर्गादेवींचा विसर्जन सोहळा शांतता आणि सुव्यवस्थेत झाला.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply