Breaking News

वीजपुरवठ्याअभावी उपकरणे बंद

महाराष्ट्र बँकेच्या कर्जत शाखेचे व्यवहार ठप्प

कर्जत : प्रतिनिधी

बँक बंद होणार, या अफवेमुळे दोन दिवसांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रच्या कशेळे शाखेत पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत तीन महिला जखमी झाल्या होत्या. त्यातच शनिवारी वीजपुरवठा खंडित झाल्याने या बँकेच्या कर्जत शाखेमधील उपकरणे बंद पडली व बँकेचे व्यवहार ठप्प झाले होते. ते येत्या दोन दिवसांत सुरळीत होतील, असे बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी सांगितले.

शनिवारी महिला मंडळाच्या सभागृहात श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. ही मैफल ऐन रंगात आली असताना विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यानंतर मोठा आवाज झाला आणि जवळच वीज पडली. त्यामुळे वीज प्रवाह काही काळ खंडित करण्यात आला होता. सभागृहाच्या तळमजल्यावर बँक ऑफ महाराष्ट्रची कर्जत शाखा आहे. सोमवारी (दि. 14) सकाळी बँक उघडली तेव्हा उपकरणे सुरू होत नव्हती व वीज पुरवठासुद्धा नव्हता. त्यामुळे बँकेचे व्यवहार सुरू होत नव्हते. शाखा व्यवस्थापक आशिष लोहकरे यांनी या घटनेची माहिती ग्राहकांना दिली.

Check Also

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात विविध विभाग, सुविधांचे लोकार्पण

पनवेल ः वार्ताहरडॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाचा आवाका वाढत चालला असून चांगली सेवा मिळत असल्याने …

Leave a Reply