नवी दिल्ली : देशात सोमवार (दि. 1)पासून कोरोना लसीकरणाच्या तिसर्या टप्प्याला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतली असून, ट्विट करीत याबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदींना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस टोचण्यात आली. या संदर्भात त्यांनी सांगितले की, एम्स रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केले ते कौतुकास्पद आहे. पंतप्रधानांनी लसीकरणासाठी पात्र देशवासीयांना आवाहन करीत भारताला कोविडमुक्त बनवूया, असेही म्हटले आहे. तिसर्या टप्प्यात 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे तसेच 45 वर्षे पूर्ण ते 60 वय असणार्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणार्या व्यक्तींचेही लसीकरण केले जाणार आहे.
Check Also
खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …