पाली ः प्रतिनिधी
स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 47वी राष्ट्रीय जलतरण, वॉटर पोलो, ड्रायव्हिंग स्पर्धा 19 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत बंगळुरू येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी बेणसे येथील प्रेषिता दत्ताराम तरे हिची निवड झाली आहे. स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने पुणे डेक्कन जिमखाना जलतरण तलावात खुली निवड चाचणी घेण्यात आली होती. या वेळी रिलायन्स फाउंडेशनच्या जे. एच. अंबानी शाळेची व रिलायन्स इंडस्ट्रीज लि. नागोठणे हेल्थ क्लबची जलतरणपटू प्रेषिता तरे हिची वॉटर पोलो प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली होती. प्रशिक्षक दत्ताराम तरे व शौर्य करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर झाले आणि प्रेषिताची ज्युनियर मुलींच्या महाराष्ट्र वॉटर पोलो संघात निवड करण्यात आली आहे.