Breaking News

उरणमध्ये मॅरेथॉन स्पर्धा : विजेत्यांचा गौरव

उरण : प्रतिनिधी

योगा विथ पूनम ग्रुपतर्फे द्रोणागिरी किल्ल्याच्या पायथ्याशी डाऊरनगर येथे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस प्रतिसाद लाभला. स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात महेश मुंजे प्रथम, अरबाज खान द्वितीय, अभय वर्मा तृतीय मुलींमध्ये स्नेहा जाधव प्रथम, साक्षी जाधव द्वितीय, तनिष्का बोरसे तृतीय, 12 वर्षाखालील गटात सार्थक गिरी प्रथम, अथर्व डॉलटे द्वितीय, सार्थक लवटे तृतीय, मुलींमध्ये प्रज्ञा मुंजे प्रथम, हर्षदा माने द्वितीय, संचिता गोरे तृतीय, 9 वर्षाखालील गटात दर्शन राठोड प्रथम, जयेश कातकरी द्वितीय, शौर्य चव्हाण तृतीय, मुलींमध्ये पूनम बुरुंगळे प्रथम, नम्रता चव्हाण द्वितीय, श्रुष्टी मनमाने तृतीय, 5 वर्षाखालील गटात स्वप्नील वनमाने प्रथम, स्वरा वाघडे द्वितीय आणि इंद्रनील येडके याने तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धा पूनम चव्हाण यांनी आयोजित केली होती. या वेळी शिक्षिका बी. एम. बिंदू, अभिनव कांबळे उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी फुलचंद पाटील, माळाप्पा बुरुंगळे, काशिनाथ पाटील, रमण चव्हाण, प्रकाश चव्हाण यांनी सहकार्य केले. या वेळी राज्यस्तरीय खेळाडू व्ही. एम. श्रीलक्ष्मी, विवेक यादव, राजन पांडे यांचा देवकी चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply