Breaking News

भास्कर जाधव म्हणजे शेतातील बुजगावणे : प्रवीण दरेकर

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात कुठलीही घटना घडली, तर दरेकर आधी पीडितांना धीर देण्यासाठी दुर्घटना स्थळी जातात की स्टुडिओत जातात हे महाराष्ट्रातील जनता जाणते. भास्कर जाधव हे डोळ्यांवर पट्टी बांधल्यासारखे वागत आहेत. त्यांना पाहिल्यावर शेतातील एखादे बुजगावणे असावे असा त्यांचा अविर्भाव व चित्र दिसून येते. अशा शब्दांमध्ये विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना आमदार व माजी मंत्री भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे.

भास्कर जाधव यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना, राज्यात कुठलीही घटना घडली तरी दरेकर स्टुडिओमध्ये दिसतात. याचा अर्थ असा होतो की एक तर ते स्टुडिओमध्ये जाऊन बसलेले असतात किंवा मीडियाचे लोक त्यांच्या घरी जाऊन बसलेले असतात. छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी प्रतिक्रिया देण्यासाठी प्रवीण दरेकर उपलब्ध असतात, असे म्हटले होते. यावर प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले.

प्रवीण दरेकर म्हणाले की, मला वाटतं भास्कर जाधव सध्या अडगळीत पडलेले आहेत. खरं म्हणजे संजय राऊत म्हणाले आहेत की मंत्र्यांनी आता प्रतिहल्ला केला पाहिजे. ते अजून काही मंत्री झालेले नाहीत, व्हायच्या प्रतीक्षेत आहेत. प्रवीण दरेकर स्टुडिओत जातात की चॅनल्सवर येतात हे महाराष्ट्रातील जनता पाहते. अतिवृष्टी झाली शेतकर्‍यांच्या बांधावर प्रवीण दरेकर असतात, महिलांवर अन्याय, अत्याचार झाला त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबास धीर देण्यासाठी प्रवीण दरेकर पोहचतात.

निसर्ग वादळ असेल, तौक्ते वादळ असेल, प्रवीण दरेकर पोहचतात. महाडला दरड कोसळली, तळीयेला गाव उद्ध्वस्त झाला, प्रवीण दरेकर पोहचतात. अगदी चिपळूणला भास्कर जाधव कुठे गायब असताना प्रवीण दरेकर पोहचतात. त्यामुळे मला वाटतं त्यांना डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखं वाटतय आणि मी तर स्टुडिओत वाटत असेल, हल्ली ते माध्यमांसमोर येतात तेव्हा त्यांना पाहिल्यावर शेतामध्ये एखादं बुजगावण असतं तशाप्रकारचा त्यांचा अविर्भाव आणि चित्र दिसतं.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply