Breaking News

किकबॉक्सिंग निवड चाचणी उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त

अमॅच्युअर किकबॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्रच्या वतीने कॅडेट ज्युनिअर सिनियर राज्यस्तरीय किकबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धेचे नुकतेच चिंचवड येथील मोरया मंगल कार्यालयात करण्यात आले होते. या वेळी राज्यातील  सुमारे 732 खेळाडू ,56 पंच, 29 प्रशिक्षक उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन डीसीपी मंचक इप्पर, युवा नेते विश्वजीत बारणे, संतोष बारणे, महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे चेअरमन सचिन भोसले, सेक्रेटरी प्रवीण काळे, उपाध्यक्ष मंदार पनवेलकर, संतोष खंदारे आदींच्या उपस्थितीत झाले. या स्पर्धेच्या कॅडेट गटात प्रथम क्रमांक पिंपरी चिंचवड, द्वितीय पुणे शहर, तृतीय मुंबई उपनगर, ज्युनियर गटात प्रथम क्रमांक मुंबई उपनगर, द्वितीय पिंपरी चिंचवड, तृतीय पनवेल शहर, सीनियर गटात प्रथम रायगड, द्वितीय पिंपरी चिंचवड शहर, तृतीय क्रमांक मुंबई सिटी यांनी पटकाविला. स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पिंपरी-चिंचवड संघाने मिळवले. बेस्ट फायटर म्हणून पुरुष गटात पनवेलचा अनुज भोसले याची, तर महिला गटात पिंपरी चिंचवडच्या खुशी सागर रेवाळे याची निवड करण्यात आली. बेस्ट रेफ्री अवार्ड मुंबई सबरबनच्या महेंद्र राजे यांना देण्यात आला. सर्व विजेत्या खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.

Check Also

मराठी चित्रपटांसाठीचे पुरस्कारही वैशिष्ट्यपूर्ण

चित्रपट संस्कृतीतील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट, पुरस्कार. असे पुरस्कार म्हणजे आपण केलेल्या कामाची विशेष दखल आणि …

Leave a Reply