Breaking News

कर्जतमध्ये लस आपल्या दारी!

अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींचे कोरोना लसीकरण

कर्जत : बातमीदार

अंथरुणाला खिळल्या आणि दवाखान्यात जाऊन कोरोना डोस घेता येत नसलेल्या कर्जत शहरातील ज्येष्ठ व्यक्तींचे येथील उपजिल्हा रुग्णालय आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण करण्यात येत आहे.

कर्जतला 100 टक्के लसीकरण झालेले शहर बनविण्यासाठी नगर परिषद व उपजिल्हा रुग्णालयाने पुढाकार घेतला गेला आहे. त्यासाठी कवच-कुंडल मोहिमेअंतर्गत घरोघरी जावून लसीकरण करण्यात येत आहे. कर्जत लसीकरण समिती संघर्ष समितीच्या आवाहनानंतर नगर परिषद व उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने आता दवाखान्यात जाऊन कोरोना डोस घेता येत नसलेल्या ज्येष्ठ व्यक्ती व रुग्णांचे घरोघरी जावून लसीकरण करण्यात  येत आहे. त्यामुळे कर्जत शहरात कवच कुंडल मोहीम यशस्वी होताना दिसत आहे.

Check Also

रिटघर येथे लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवी वर्ष शुभचिंतन समारंभ उत्साहात

विद्यालयासाठी ४० लाखांची घोषणा पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, थोर देणगीदार, …

Leave a Reply