उरण : वार्ताहर
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ नुकतीच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उरण महापालिका शाळेच्या प्रांगणात सभा झाली. या वेळी उरण तालुक्यातील सारडे येथील शेकाप कार्यकर्त्यांनी शिवसेनेेत जाहीर प्रवेश केला. या सभेस आमदार मनोहर भोईर, जेएनपीटीचे विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, सल्लागार बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, जि. प., पं. स. सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उरण तालुक्यातील सारडे येथील शेकापचे मनोज पाटील यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. यात जे. के. म्हात्रे, एन. जी. पाटील, प्रवीण पाटील, किरण भारत पाटील, धनाजी म. पाटील, अमृत ठाकूर, विवेक घरत, शिवं पाटील, आदित्य गावंड, स्वराज तोटे, संदीप राम, अक्षय उंडाळकर, आयुष रोकडे, अविनाश प्रसाद, पिंटू नोडी, समीर तोटे, शुभम गिरी, अन्सारी रझ्झाक, कार्तिकी बोबाले, अजय वर्मा, शिवं सोनी, संदीप धेरे, रोहित साळुंखे, ऋषी पाटील, अमरजित राम, राहुल पाटील, प्रसाद तुंबडे, अरविंद पाटील, महेश पाटील आदींचा समावेश आहे.