Breaking News

माणगावात एसपी फिटनेस हबचे प्रवीण पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

माणगाव : प्रतिनिधी

माणगाव येथील प्रसिद्ध युवा क्रिकेटपटू सुहेब अकबर परदेशी यांनी माणगावात जुने पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी प्रशस्त हॉलमध्ये अत्याधुनिक व्यायाम साहित्यासह  एसपी फिटनेस हब नावाने जिम्नॅशियम सुरू केले आहे. या जिम्नॅशियमचे उद्घाटन शनिवारी (दि. 30) सायंकाळी 5:30 वा. माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांच्या हस्ते झाले.

या वेळी राजिपचे माजी सभापती अ‍ॅड. राजीव साबळे, सामाजिक कार्यकर्ते अकबर परदेशी, सिराज परदेशी, रवींद्र मोरे, जिम्नॅशियमचे प्रोप्रायटर युवा क्रिकेटर सुहेब परदेशी, फिरोज बावानी, मस्जिद मोहल्ला, जुने माणगाव अध्यक्ष सरफराज अफवारे, बाजारटेप मोहल्ला अध्यक्ष शेखहुस्सैन आकुस, आरीफ करबेलकर, फहद करबेलकर आदींसह तरुण युवक, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. रविवारी सुट्टीचा दिवस वगळता आठवड्याचे सहा दिवस सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 4 ते 10 या वेळेत हे जिम्नॅशियम सर्वांसाठी खुले राहील, अशी माहिती जिम्नॅशियमचे प्रोप्रायटर सुहेब परदेशी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply