माणगाव : प्रतिनिधी
माणगाव तालुक्यातील खरीवली आदिवासीवाडी येथील दीड वर्षीय बाळाचा बुधवारी (दि. 3) विषारी साप चावल्याने मृत्यू झाला. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुचिता किसन हिलम (वय 23, रा. खरीवली आदिवासीवाडी) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. माणगाव पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील मयत बाळ साहिल किसन हिलम (वय एक वर्षे सहा महिने) यास कोणतातरी विषारी साप चावल्याने औषधोपचाराकरिता माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वेळी उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू सीआरपीसी 174 प्रमाणे करण्यात आली आहे. अधिक तपास निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दोडकुलकर करीत आहेत.
Check Also
आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …
RamPrahar – The Panvel Daily Paper