Breaking News

उरणमध्ये रिक्षाचालकांना मिठाईसह आर्थिक मदत

उरण : वार्ताहर

उरण शहरातील वीर सावरकर मैदानाजवळ असलेल्या उरण तालुका द्रोणागिरी रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे दिवाळीनमित्त संघटनेच्या सदस्यांना बुधवारी (दि. 3) मिठाई व एक हजार रुपये रक्कम देण्यात आली.

कोरोना काळात रिक्षा चालकास संघटनेकडून आर्थिक मदत म्हणून दोन हजार रुपयाची मदत देण्यात आली. तसेच संघटनेचा सभासद मयत झाला तर त्याच्या कुटुंबाला रोख 10 हजार रुपये मदत दिली जाते. गुढीपाडव्याला सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे करंजा ते शिर्डी पायी पदयात्रा जाणार्‍या भक्तांना संघटनेच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था केली जाते. नोटीस बोर्डावर सुविचार, मोठ्यांचे विचार लिहून जनजागृती केली जाते.

या कामी उरण तालुका द्रोणागिरी रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील, सेक्रेटरी महेंद्र  घरत, खजिनदार दिपक म्हात्रे, सल्लागार जयराज म्हात्रे, रमेश म्हात्रे, माजी सेक्रेटरी कैलास म्हात्रे, अजय धोत्रे आदी पदाधिकार्‍यांचे सहकार्य लाभले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply