Breaking News

पनवेल एसटी स्थानकात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची मागणी

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल एसटी स्थानकात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची मागणी भाजपच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र देऊन केली आहे. पनवेल हे मुंबईचे प्रवेशद्वार समजले जाते. मुंबई, ठाणे, कल्याण आदींसह घाटमाथा, कोकणात जाणार्‍या प्रवाशांची मोठी वर्दळ या ठिकाणी असते. अनेक वेळा गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमार प्रवाशांचे पाकीट, मोबाईल व महिलांचे दागिने खेचून नेत असतात. पनवेल स्थानकात यापूर्वी पोलीस चौकी होती, पण ती एका बाजूला असल्याने गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी त्याचा उपयोग होत नव्हता. सध्या त्या ठिकाणी चौकीच नाही. त्यामुळे नगरसेवक मनोज भुजबळ यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना व पनवेल शहर पोलीस निरीक्षकांना पत्र देऊन पनवेल एसटी स्थानकात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची मागणी केली आहे.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply