Breaking News

पनवेल महापालिका क्षेत्रातही ‘ड्राईव्ह इन लसीकरण’सुरू करा

भाजपच्या अभिषेक पटवर्धन यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

मुंबई व नवी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातही ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजप सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी केली आहे. ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरु केल्यास त्याचा ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना नक्कीच फायदा होईल, असे नमुद करून त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. निवेदनाची प्रत आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांना दिली आहे.

पटवर्धन यांनी निवेदना म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही आठवड्यापासून लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. परिणामी महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव हा काहीसा कमी होताना दिसत आहे, परंतु जसे व्यवहार सुरु होतील आणि अनलॉक होत जाईल तसे पुन्हा कोरोनाचे संकट बळावण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटे बाबतदेखील मीडियामधून समजते आहे.

कोरोना सोबत जगणे हे आपल्याला शिकावेच लागणार आहे आणि त्याकरीता आपल्या क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाने कोविडविरोधी लस घेणे आवश्यक आहे. महानगरपालिकेची लोकसंख्या बघता, होणारे लसीकरण व सध्या कार्यरत असलेले केंद्र हे अपुरे आहेत असे लक्षात येते. आपण लसींचा पुरवठा वाढवावा, तसेच लसीकरण केंद्रही वाढवावे.

मुंबई व नवी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करावे जेणेकरून ज्येष्ठ व दिव्यांगांना याचा फायदा होईल, तसेच हा उपक्रम सुरु केल्यास असे नागरिक जे कोरोनाच्या भीतीने लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी घाबरत आहेत तेदेखील लसीकरण करायला पुढे सरसावतील.

खारघर येथील लिटिल वर्ल्डस मॉल अथवा सेंट्रल पार्क चा परिसर आणि पनवेल येथील ओरियन मॉल अथवा वडाळे तलावाच्या परिसरात हे लसीकरण केंद्र सुरू करता येऊ शकते. लसीकरणाची प्रक्रिया ही जितकी सोपी आणि सुटसुटीत राहील तितका त्याला प्रतिसाद जास्त मिळेल. ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र हे त्या दृष्टीने एक पाऊल असेल.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply