Breaking News

कसळखंडच्या उपसरपंचपदी भाजपचे महेंद्र गोजे यांची बिनविरोध निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त

कसळखंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक बुधवारी (दि. 10) झाली. या निवडणुकीत भाजपचे महेंद्र गोजे यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचीत उपसपरंच महेंद्र गोजे यांचे अभिनंदन केले. उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर महेंद्र गोजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, सरपंच माधुरी अनिल पाटील, माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, सदस्य निवेदिता लबडे, लता पाटील, मोनिका पाटील, भाजप नेते जयवंत पाटील, ओंकार पाटील, तानाजी पाटील, राम गोजे, सदानंद गोजे, साजन पाटील, संदेश गोजे, सुमित गोजे, दत्ता गायकर, प्रवीण गोजे, अमोल पाटील, महादेव पाटील, नितीन लबडे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply