गडचिरोली ः जिल्ह्यातील ग्यारापट्टीच्या जंगलात शनिवारी (दि. 13) झालेल्या चकमकीत महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 युनिटकडून 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत तीन जवान जखमी झाले आहेत. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी ही माहिती दिली. जखमी जवानांना उपचारासाठी तत्काळ हेलिकॉप्टरद्वारे नागपूरला हलविण्यात आले आहे. कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख अद्याप समोर आलेली नाही, मात्र यामध्ये नक्षलवाद्यांच्या मोठ्या नेत्याचादेखील समावेश असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. चकमक झालेल्या ठिकाणास जवानांनी वेढा दिलेला असून जवानांकडून अद्यापही परिसरात शोधमोहीम सुरू आहे. या कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याचीदेखील शक्यता आहे.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper