Breaking News

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात लहान मुलांचे हृदयतपासणी शिबिर

खारघर : प्रतिनिधी

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात लहान मुलांचे टुडी इको शिबिर झाले. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम व श्री सत्यसाई संजीवनी सेंटर चाईल्ड हार्टकेअर अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन पेडियाट्रीक स्किल्स, खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 13) हे शिबिर झाले.

14 वर्षे वयोगटातील मुलांची या वेळी हृदयतपासणी करण्यात आली. जन्मजात मुलांमध्ये हृदयविकाराचे आजार वाढत चालले असून टुडी इको तपासणीद्वारे हृदयाच्या आजारांची माहिती मिळत असल्याने ही चाचणी महत्त्वाची समजली जाते.

या शिबिराला पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षक सुचिता गवळी, रायगड जिल्ह्याचे माजी शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, डॉ. बी. एम. काळेल, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. अरुणा पोहरे, सत्यसाई हर्टकेअर सेंटरचे डॉ. सी. एस. श्रीनिवास, डॉ. स्नेहा कुलकर्णी, डॉ. प्रचिती म्हात्रे आदी उपस्थित होते.

या वेळी एकूण 33 मुलांच्या टुडी इको तपासणी करण्यात आली. यामध्ये 17 मुलांचे रिपोर्ट नॉर्मल आले. उर्वरित आठ मुलांना जन्मजात हृदयाचे विकार असल्याचे निदान झाले. तीन मुलांना हृदयाच्या शस्त्रक्रियेची गरज असल्याचे सांगण्यात आले. चार मुलांना पुन्हा तपासणीसाठी बोलविण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, तसेच कर्मचार्‍यांनी मेहनत घेतली. श्री सत्य साई संजीवनी सेंटर रुग्णालयात लहान मुलांमध्ये जन्मजात हृदयविकाराच्या आजारांवर मोफत

उपचार केले जातात.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविल्या जाणार्‍या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतून 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी केली जाते. त्यातून संदर्भित केलेल्या बालकांवर आवश्यक त्या शस्त्रक्रिया निरनिराळ्या योजनेतून पूर्णपणे मोफत करून घेतल्या जात आहेत.

Check Also

अष्टपैलू गायिका आशा भोसले

आशा भोसले… सुरुवात कुठून करावी असा या व्यक्तिमत्वाची खोलवर ओळख करून देताना मला प्रश्न पडतोय …

Leave a Reply