Breaking News

गोरगरीब मुलांसोेबत ‘दिशा’चा बालदिन

पनवेल : रामप्रहर वृत्त

बालदिनानिमित्त दिशा महिला व्यासपीठाने ओपन एज्युकेशनमधील मुलांसाठी बालमहोत्सव आसुडगाव येथे सोमवारी (दि. 15) आयोजित केला होता. यानिमित्त डोंबार्‍याचा खेळ करून पोटाची खळगी भरणार्‍या मुलांसाठी डॉ. कोलते व अनिता कोलते यांनी ब्रिजखाली सुरू केलेल्या शाळेत शिकणार्‍या मुलांसाठी हा दिवस आनंदात, उत्साहात जावा यासाठी आयोजन केले होते.

चपलेऐवजी पायाखाली दोर असणार्‍या या अनवाणी चालणार्‍या मुलांना चप्पल वाटप, नाश्ता, कपडे व बालदिन विशेष केक कापून त्यांच्या चेहर्‍यावर आनंद देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर विद्या मोहिते व खुशी सावर्डेकर यांनी मुलांबरोबर गप्पा गोष्टी करत विविध स्पर्धांचे आयोजन करून बक्षीस वाटप व शैक्षणिक साहित्य मुलांसाठी दिले. एक दिवस उत्साहात साजरा झाला म्हणून मुलांच्या चेहर्‍यावर एक आगळा वेगळा आनंद दिसत होता.

या मुलांसाठी एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे, उद्योगपती गजानन साळुंखे, निरव नंदोला, तसेच दिशा व्यासपीठाच्या हिरकणी डॉ. शिल्पा भंडारवर, मनीषा मोरे, भावना सरदेसाई, प्रज्ञा मोरे, सविता महाले, प्रिया पाटील, रूपा कवीश्वर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या बालदिनानिमित्त मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी मंगेश आढाव, शुभांगी खरात, डॉ. रुक्मिणी, तसेच दिशा व्यासपीठाच्या सख्यांची उपस्थिती लाभली. दिशा सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष निलम आंधळे यांनी मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा देऊन उपस्थितांचे आभार मानले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply