‘रवि डायवेअर’च्या कामगारांना वेतनवाढ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत करार

पनवेल ः रामप्रहर वृत्त
जय भारतीय जनरल कामगार संघटनेने रवि डायवेअर कंपनीतील कामगारांना 10 हजार 500 रुपयांची भरघोस पगारवाढ मिळवून दिली आहे. या संदर्भातील करार बुधवारी (दि. 24) भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात संघटनेचे सल्लागार तथा भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला.
भाजप पुरस्कृत जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्याचे काम सुरू आहे. रवि डायवेअर कंपनीतील कामगारांचा अनेक दिवसांपासूनचा पगारवाढ आणि इतर सुविधांचे प्रश्न अनेक दिवस प्रलंबित होते. या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली
कंपनीचे डायरेक्टर विकास सरोगी आणि मॅनेजर यरूलकर यांच्यासोबत कामगारांच्या पगारवाढ आणि सुविधांबाबत चर्चा केली. त्यानुसार बुधवारी जय भारतीय जनरल कामगार संघटना आणि रवि डायवेअर कंपनीमध्ये 10 हजार 500 रुपयांच्या भरघोस पगारवाढीचा कारार झाला.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, सचिव जगदिश म्हात्रे, कार्यालयीन सचिव समिरा चव्हाण, रवींद्र कोरडे, अरुण नरावडे, जालिंदर तिकुडे, चंद्रकांत फडके, रमेश राजबर, मोहन शेशकर, सदानंद तुटी, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदांसाठी भाजप महायुतीकडून पाच जणांचे अर्ज दाखल

युवा नेते परेश ठाकूर, डॉ. अरुणकुमार भगत, गणेश कडू, अ‍ॅड. प्रथमेश सोमण, दिनेश खानावकर यांचा …

Leave a Reply