Breaking News

निर्भया प्रकरण : दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर

‘डेट वॉरंट’ला कोर्टाची स्थगिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पतियाळा हाऊस कोर्टाने निर्भया निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींच्या फाशीसाठी काढण्यात आलेल्या ’डेथ वॉरंट’वर पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे चारही दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.
पतियाळा हाऊस कोर्टात तिहार कारागृहाच्या वतीने इरफान अहमद यांनी शुक्रवारी (दि. 31) बाजू मांडली. विनय शर्माची दया याचिका अद्याप प्रलंबित असून, अन्य तीन दोषींना उद्या फाशी देणे शक्य आहे, असे अहमद यांनी म्हटले. यात काहीही बेकायदेशीर ठरणार नाही. मुकेश या आरोपीची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. त्याच्यापाशी आता कोणताही कायदेशीर पर्याय उरलेला नाही, असेही ते म्हणाले. त्याचवेळी अक्षय या आरोपीच्या वकिलांनी हस्तक्षेप करीत आमची पुनर्विचार (क्युरेटिव्ह) याचिका फेटाळण्यात आली असली, तरी आम्हाला दया याचिका करायची आहे, असे नमूद केले. त्यानंतर कोर्टाने पुढील आदेशापर्यंत ’डेथ वॉरंट’ला स्थगिती दिली.
दरम्यान, निर्भया प्रकरणातील एक दोषी पवन गुप्ताची फेरविचार याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. जेव्हा घटना घडली तेव्हा आपण अल्पवयीन होतो असा दावा पवन गुप्ताने केला होता. तो दावा सुप्रीम कोर्टाने अमान्य केला.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply