Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सुकापूर परिसरात पथदिव्यांचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त

सुकापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करत विविध सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील भगतवाडी ते मालेवाडी स्टॉप या माथेरान रोडवर पथदिवे उभारून हा परिसर प्रकाशमय करण्यात आला. या पथदिव्यांचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 24) करण्यात आले. पथदिवे लोकार्पण सोहळ्याच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, सुकापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता पाटील, माजी सरपंच आलुराम केणी, महेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राजेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होेते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सर्व सामान्य जनतेच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी काम करत राहणे ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे एकजुटीने काम करीत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply