Breaking News

सुरक्षा जवानांसाठी अत्याधुनिक वाहने तैनात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारत सरकार लवकरच सुरक्षा दलातील सैनिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन गाड्यांची खरेदी करण्याच्या तयारीत आहे. नक्षली भाग, जम्मू आणि काश्मीर आणि दुर्गम भागात तैनात करण्यात येणार्‍या सैनिकांच्या सुरक्षेसाठी आता अधिक सक्षम आणि सुरक्षित असणार्‍या माईन प्रोटेक्डेट गाड्यांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. सरकारने 613 कोटी 96 लाखांचे बजेट पास केले आहे.

या पैशांमधून केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि केंद्रीय सुरक्षा दलासाठी (बीएसएफ) माईन प्रोटेक्डेट म्हणजेच स्फोटांपासून संरक्षण करणार्‍या गाड्या, बुलेटप्रूफ जॅकेट, रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. गृहमंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय सुरक्षा दलासाठी (एनएसजी) 16 कोटी 84 लाखांची तरतूद करण्यात आली असून या पैशांमधून रिमोटने चालणारी सात वाहने विकत घेतली जाणार आहेत.

सध्या नक्षलग्रस्त, तसेच जम्मू काश्मीरमधील काही भागांमध्ये सीआरपीएफ माइन प्रोटेक्टेड व्हेइकल्स (एमपीव्ही) वापरतात. या गाड्यांमध्ये एका वेळेस सहा जवान प्रवास करू शकतात. नवीन गाड्या सुरक्षा दलाच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर सुरक्षा दलांना नक्षलवादी, तसेच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून होणार्‍या एलईडी हल्ल्यांना अधिक सक्षमपणे उत्तर देता येईल, असे गृहमंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

रिमोटने चालणार्‍या सात आरओव्ही (रिमोटेडली ऑप्रेटेड व्हेइकल्स) एनएसजीच्या ताफ्यात सहभागी होणार आहेत. या गाड्यांच्या मादतीने इमारती, बस, मेट्रो तसेच रेल्वे स्थानकांमध्ये जवानांच्या उपस्थितीशिवाय एलईडी निकामी करता येऊ शकतील. या आरओव्ही गाड्या 45 डिग्रीमध्ये शिड्या, तसेच चढउतार असणार्‍या ठिकाणी आठ किलोपर्यंतचे वजन घेऊन जाऊ शकतात. या गाड्यांवर एमएमजी गन, एमपी फाइव्ह हत्यारे आणि शॉर्टगन सारखी हत्यारे लावण्याची सोय आहे. या गाड्यांवरील कॅमेर्‍यासारख्या सिस्टीममुळे गाडीच्या आजूबाजूचा परिसर रिमोटने ती चालवणार्‍यांना थेट केबिनमध्ये दिसण्याची सोय असून यात एक्स रे स्कॅनर्सचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.या गाड्यांमध्ये 4.76 लीटरच्या इंजिनबरोबरच 4 सिलिंडर टर्बो चार्ज डिझेल इंजिन आहे. 4ु4 प्रकारातल्या या गाडीत 2.2 टन वजनाचे साहित्य आणि एका वेळी 10 जणांना घेऊन जाण्याची क्षमता आहे. या गाडीचे वजन 11 टन इतके असले, तरी गाडीचा सर्वोत्तम वेग 110 किलोमीटर प्रती तास इतका असून एकदा इंधन भरल्यानंतर गाडी एक हजार किमी प्रवास करू शकते.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply