Breaking News

पेझारी येथे रंगले कविसंमेलन

श्रीगाव : प्रतिनिधी

कोएसोच्या पेझारी (ता. अलिबाग) येथील लक्ष्मीशालिनी महाविद्यालय, आगरी साहित्य विकास मंडळ आणि नक्षत्रांचं देणं काव्यमंच यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 25) महाविद्यालयात कविसंमेलन घेण्यात आले. प्राचार्य मारोती भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कविसंमेलनात सविता पाटील, मोहन पाटील, हिरामन पाटील, सचिन पाटील, रामचंद्र म्हात्रे, सदानंद ठाकूर, शिवाजी मोकल, प्रा. चंद्रकांत पाटील, प्रा. महेश बिर्‍हाडे यांच्यासह अनेक कवींनी आगरी भाषेतील कविता सादर केल्या. सर्व सहभागी कवींना महाविद्यालयाची माहितीपुस्तिका व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी प्रा. दिलीप पाटील, प्रा. अनिल बांगर, प्रा. बटु वाघ आदींनी परिश्रम घेतले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply