Breaking News

नवी मुुंबईत ऑक्सिजन प्लांटची उभारणी; शिंडलर कंपनी व तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा संयुक्त उपक्रम

नवी मुंबई : बातमीदार

ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. नव्या विषाणूचा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्राला ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागल्या आहेत.  भविष्यात जर कोरोनाची तिसरी लाट आली, तर एकाही रुग्णाला ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी नेरूळ, नवी मुंबई येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरमध्ये ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. भारतातील उद्वाहन (लिफ्ट) बनविणार्‍या शिंडलर या कंपनीने, तसेच तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. हा ऑक्सिजन प्लांट पीएसए या टेक्नोलॉजीच्या मदतीने बनविला असून दरदिवशी क्यूए 1000 ऑक्सिजन प्लांटमधून रोज 98 जंबो ऑक्सिजन सिलिंडर भरता येणार आहेत. या उपक्रमाविषयी बोलताना शिंडलर कंपनीच्या मुख्य पीपल ऑफिसर शीतल शहा म्हणाल्या, गेल्या दोन वर्षांमध्ये आपण खूपच कठीण परिस्थितीला सामोरे गेलो आहोत. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हा ऑक्सिजन प्लांट उभारून गरजवंतांना एक छोटीशी मदत केली आहे. या ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनाच्या वेळी बोलताना तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त मल्हार राणा जगजीतसिंह पाटील म्हणाले, कोरोना महामारीशी लढताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरच्या प्रत्येक कर्मचार्‍याने आपले योगदान दिले आहे. या लढाईत आता आम्हाला ऑक्सिजन प्लांटची सुविधा उपलब्ध झाली आहे. शिंडलर या कंपनीचा मी आभारी असून त्यांनी या लढाईसाठी मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply