Breaking News

पेण कासू येथे लाखोंचे सागवान जप्त

वडखळ वनविभागाकडून तीन आरोपींवर कारवाई; कटर मशिनी जप्त

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील कासू येथील चिरकाम करणार्‍या घरावर धाड टाकून वडखळ वन विभागाने हजारो रुपयांचा सागवान चिरीव माल तसेच कटर मशिन जप्त केल्या.  या प्रकरणी तीघाजणांविरोधात वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वनक्षेत्रपाल कुलदीप पाटकर यांनी पेण, वडखळ, पाली येथील वनकर्मचार्‍यांना घेऊन पेण तालुक्यातील कासू येथील तीन घरांवर धाड टाकून विनापास अवैधरित्या चिरीव सागवान (किंमत सुमारे दोन लाख 50 हजार रुपये) व तीन रंदा कटर मशिन (सुमारे एक लाख 40 हजार रुपये) असा माल जप्त केला. या प्रकरणी तिघांजणांवर कारवाई करत साग, चिरीव लाकडांचा माल जप्त करुन भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41,42 व महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे कलम 5382 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गडब वनपाल दिनेश पाटील  करीत आहेत.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply