पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील रास्तभाव रेशन दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने पनवेल येथील प्रशासकीय भवनात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक शनिवारी (दि.21) अप्पर तहसीलदार कार्यालय हॉलमध्ये पार पडली.
या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी सोनावणे, तहसीलदार मीनल भामरे-भोसले, पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, तालुका पुरवठा अधिकारी श्रीमती धानवे, नायब तहसीलदार राजश्री जोगी यांची उपस्थिती होती. यावेळी रास्तभाव रेशन दुकानदारांच्या विविध अडचणी, प्रलंबित प्रश्न आणि त्यांच्या मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper