पनवेल : रामप्रहर वृत्त
कार्ल्याची आई एकविरा ही समस्त आगरी-कोळी समाजाचे श्रद्धास्थान असून या पवित्र स्थळी भाविकांच्या सुविधेसाठी एकविरा पायथा मंदिरासमोर सभामंडप उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वेहरगाव ग्रामस्थांनी शनिवारी (दि. 21) पनवेल येथे येऊन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेत सभामंडप उभारणीसाठी सहकार्य करण्याची विनंती केली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सामाजिक बांधिलकी जपत तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत सभामंडपासाठी पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
भाविकांना अधिक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि धार्मिक स्थळाचा विकास व्हावा हा आपला नेहमीच प्रयत्न असल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, वेहरगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, वेहरगावचे माजी सरपंच गणपत पडवळ, सुरेश गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर पडवळ, उद्योजक चंद्रकांत शेलार, एकविरा आई देवस्थानचे उपाध्यक्ष सागर देवकर, खजिनदार विकास पडवळ, माजी सरपंच अशोक पडवळ, पंचायत समिती सदस्य राजूशेठ देवकर, मनसे मावळ तालुकाध्यक्ष अशोक कुटे, पोलीस पाटील अनिल पडवळ, एकविरा पायथा मंदिर व्यवस्थापक संतोष देवकर अदी उपस्थित होते.
Check Also
स्व. भागुबाई चांगू ठाकूर यांच्या १३व्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मातोश्री स्व. …
RamPrahar – The Panvel Daily Paper