Breaking News

कर्जतमधील ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर

कर्जत : प्रतिनिधी

तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींमधील सदस्यपदाच्या 15 जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या होत्या. यामधील चार ग्रामपंचायतीच्या जागा बिनविरोध झाल्या. दोन ग्रामपंचायतीच्या जागेसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल झाली नाहीत. तीन ग्रामपंचायतींमधील चारपैकी तीन जागांसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले होते, त्यांची मतमोजणी बुधवारी (दि. 22) झाली. त्यात माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायत (प्रभाग 4) नयना संदीप गायकवाड 60 (विजयी), वदप ग्रामपंचायत (प्रभाग 2) कल्याणी कैलास पोटे 333 (विजयी). बिनविरोध सदस्य भालीवडी ग्रामपंचायत 6 जागांसाठी प्रभाग 1 मध्ये दीपक वसंत कार्ले, प्रभाग 2 मध्ये नंदिनी नंदू माळी, प्रभाग 3 मध्ये समीर रामदास ठाकरे व प्रतिका रमेश कटके, प्रभाग 4 मध्ये आशा राजेश कर्णूक व राजेश तुळशीराम शेळके. बीड ग्रामपंचायत प्रभाग 2 मध्ये हेमंत वासुदेव घरत. नांदगाव ग्रामपंचायत प्रभाग 2 मध्ये देविदास हरी केवारी. दहीवली तर्फे वरेडी ग्रामपंचायत प्रभाग 2 मध्ये ज्योत्स्ना किसन जामघरे. ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. एच. जाधव, अभिजित खैरे, डी. पी. राठोड यांनी काम पाहिले.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply