Breaking News

गणपतीवाडी ते आंबेगाव रस्त्यावर दुभाजक उभारावेत -बंडू खंडागळे

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील गणपतीवाडी बायपास ते आंबेगाव रस्त्यावर लहान-मोठे अपघात होत असून याठिकाणी लवकरात लवकर दुभाजक बसवावेत अशी मागणी भाजप जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. पेण-खोपोली बायपास रस्ता हा एक्सप्रेस हायवे प्रमाणे बनल्याने या रस्त्यावरून अनेक वाहने जात असतात. यामध्ये चारचाकी, तीनचाकी प्रवासी रिक्षांचाही समावेश आहे. या रस्त्यावर गणपतीवाडीपासून आंबेगावच्या आसपास मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती निर्माण होत आहे. त्यामुळे छोटे-मोठे अनेक अपघात होत आहेत. ते टाळण्यासाठी गणपतीवाडी बायपासपासून आंबेगावपर्यंतच्या रस्त्यावर फायबर दूभाजक बसविणे गरजेचे आहे, खंडागळे यांनी निवेदनात म्हटले आहे. याबाबत आमदार रवीशेठ पाटील यांनासुद्धा निवेदन देण्यात येणार असल्याचे बंडू खंडागळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply