Breaking News

पनवेल भाजप ओबीसी मोर्चातर्फे मानवी साखळी आंदोलन करून पंजाब सरकारच्या या कृतीचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जानेवारी रोजी पंजाबच्या दौर्‍यावर असताना तेथील काँग्रेस सरकारने सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी ठेवल्या. सुरक्षेत केलेली कुचराई व कट कारस्थान रचुन केलेल्या चुकीमुळे पंजाबमधील काँग्रेस सरकारचा देशभरात निषेध व्यक्त करण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्च्याच्या वतीने बुधवारी (दि. 12) मानवी साखळी आंदोलन करून पंजाब सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यात आला. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थितीत लाभली.
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जानेवारी रोजी पंजाबच्या दौर्‍यावर असताना तेथील काँग्रेस सरकारने सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी ठेवल्या. सुदैवाने पंतप्रधान संकटातून बचावले. पंजाबमधील काँग्रेस सरकारने अतिशय खालच्या स्तराच्या मानसिकतेतून हेतुपुरस्सरपणे घडविलेल्या या घटनेचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के. लक्ष्मण व प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या निर्देशावरून बुधवारी सर्व जिल्हा व मंडल स्तरावर मानवी साखळी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. त्यानुसार पनवेलमध्येही ओबीसी मोर्चाच्यावतीने ही मानवी साळखी आंदोलन करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन कोरोना नियमांचे पालन करून काळे मास्क तोंडावर बांधून, तसेच गळ्यात भाजपचा दुप्पटा घालून करण्यात आले.
या वेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व सामान्य जनतेचे नेते असून, त्यांच्या सुरक्षेत पंजाबमधील काँग्रेस सरकारने निकृष्ट मानसिकतेने त्यांच्या सुरक्षेत कुचराई केली या घटनेचा निषेध व्यक्त केला.
या मानवी सांखळी आंदोलनाच्या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, ओबीसी मोर्चाच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, ओबीसी मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, शहर अध्यक्षा तथा प्रभाग समिती सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे, प्रमिला पाटील, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, ओबीसी पनवेल शहर अध्यक्ष रामनाथ पाटील, राकेश भुजबळ, नितीन भुजबळ, अजित लोंढे, किशोर शिंदे, संजय जैन यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply