Breaking News

सीकेटी विद्यालयात ‘वाद्य आविष्कार’

स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे 26वे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी (दि. 11) उत्साहात साजरा झाला. या स्नेहसंमेलनात ‘वाद्य आविष्कार’ या शीर्षकांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल आणि विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विश्वस्त व उपकार्याध्यक्ष डॉ. संदीप इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत, नगरसेवक अ‍ॅड मनोज भुजबळ, नगरसेविका सुशीला घरत, माजी नगरसेविका वर्षा नाईक, मोतीलाल कोळी, लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, सीकेटी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदुमती घरत, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मुख्याध्यापक सुभाष मानकर, पर्यवेक्षिका अनुराधा कोल्हे, प्रशांत मोरे, अजित सोनवणे, तसेच सीकेटी संकुलातील सर्व विभाग प्रमुख प्रमुख उपस्थित होती.
या वेळी विद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन, तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते झाला.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply