Breaking News

भाजपच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन

अलिबााग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. मागच्या निवडणुकीत कुठेच फारसा प्रभाव न पडलेल्या भाजपचे सहा जागांवर, तर स्थानिक आघाडी केलेले दोन असे एकूण आठ उमेदवार निवडून आले आहेत. अर्थात ही भाजपची सुरुवात आहे, असे प्रतिपादन भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केले. नगरपंचायत निवडणुकीतील भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांना भेटून जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्या वेळी ते बोलत होते. अ‍ॅड. मोहिते म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये 2021पूर्वी अवघे तीन आमदार होते, पण आज तिथे 77 आमदार आहेत. तेच चित्र पुढच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, जिल्हा नेते आमदार प्रशांत ठाकूर या सर्वांच्या मार्गदर्शनात बघायला मिळेल, असा निश्चित विश्वास आहे. हाच विश्वास सर्व सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बाळगायला हरकत नाही. सन 1984मध्ये केवळ दोन खासदार असलेला भाजप सध्या दुसर्‍यांदा बहुमत घेऊन देशात सत्तेत आहे. आपणही तोच आदर्श घ्यायचा आहे. आज आठ जागा आहेत. त्या उद्या 80 कशा होतील यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, बिपीन म्हामुणकर, बूथ संपर्क अभियान लोकसभा संयोजक सोपान जांभेकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश महाडिक, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, अनंत पाटील, अजित भाकरे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply