Breaking News

कामोठे भाजपतर्फे गरजूंना शैक्षणिक साहित्यासह खाऊवाटप

कामोठे : रामप्रहर वृत्त

भाजप कामोठे मंडलच्या पदाधिकार्‍यांनी कामोठे परिसरातील फासे पारधी समाजाच्या पालावर जाऊन तिथल्या कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यांना वह्या, पुस्तक, पेन, पेन्सिल आणि खाऊचे वाटप करण्यात आले.

मूळचे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील असलेले ही कुटुंबे आपला शिकारीचा उद्योग सोडून पोटाच्या मागे मुंबईत आले, पण शिक्षणाच्या अभावामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कामोठे मंडलच्या शिष्टमंडळाने सांगितले.

या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा महिला विमुक्त व भटक्या जमाती महिला अध्यक्ष विद्या तामखडे, उपजिल्हाध्यक्ष नीता मंजुळे, पनवेल शहर झोपडपट्टी अध्यक्ष चंद्रकांत मंजुळे, कामोठे मंडल आध्यात्मिक सेल संयोजक विनोद खेडकर, सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील, कामोठे मंडल ओबीसी सरचिटणीस रोहिणी कंक, कामोठे मंडल भविआ अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली देवढे, सह संयोजिका मनीषा बेरगळ, दिपाली माने, पूनम चोपडे, स्वाती धडस आदी उपस्थित होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply