Breaking News

मोहोपाड्यातील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा प्रवाशाचा किमती मोबाइल केला परत

मोहोपाडा ः प्रतिनिधी

एका प्रवाशाचा रिक्षात सापडलेला मोबाइल रिक्षाचालकाने परत केला. याबद्दल या प्रामाणिक रिक्षाचालकाचे कौतुक होत आहे. मोहोपाडा येथील स्वराज माळी हा लोधिवली अंबानी स्कूलचा विद्यार्थी असून तो लोधिवली ते मोहोपाडा असा रिक्षाने सोमवारी (दि. 14) दुपारच्या सुमारास प्रवास करीत होता. या वेळी त्याचा 25 हजार रुपये किमतीचा मोबाइल हरविला. हा मोबाइल विनोद शर्मा यांना रिक्षात सापडल्याने त्यांनी प्रामाणिकपणा दाखवून स्वराज माळी याचा शोध घेतला व मोहोपाडा रिक्षा चालक मालक संघटनेच्या थांब्याजवळ बोलवून मोबाइल सुपूर्द केला. संघटनेच्या वतीने शर्मा यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्याचा सत्कार करण्यात आला.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply