Breaking News

पनवेलमध्ये चौथ्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन

पनवेल : वार्ताहर

पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याहस्ते  शहरातील लाइफलाइन हॉस्पीटल येथे चौथ्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

या वेळी उपायुक्त संजय शिंदे, अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, लाइफलाइन हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश पाटील, डॉ. जयश्री पाटील, डायरेक्टर पराग बेडसे, डॉ. आनंद गोसावी, चांडक, रेहाना, डॉ.लोहारे, डॉ. अजिंक्य पाटील, डॉ. केतकी म्हस्के, डॉ. अभिजीत म्हस्के शुभांगी पाटील, रोजी सिंग आदी उपस्थित होते.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात या लसीकरण केंद्राला चांगला प्रतिसाद मिळत असून, या पुर्वी एमजीएम हॉस्पिटल, डॉ.पोळ हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल या ठिकाणी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. व आज पनवेल शहरातील लाईफलाईन हॉस्पिटल येथे चौथे केंद्र सुरू केले जात आहे. सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply