पर्यायी व्यवस्था करून बससेवा सुरु करावी; मुरूड शहर संघर्ष समितीचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

मुरूड  : प्रतिनिधी

आपल्या आगारातील कर्मचारी हजर होत नसतील तर मुरूड आगार व्यवस्थापकांनी एसटीच्या विभागीय कार्यालयाकडे पर्यायी चालक, वाहकांची मागणी करून  प्रवाशी सेवा पुर्ववत सुरु करावी, अशी मागणी मुरूड शहर संघर्ष समिती तर्फे करण्यात आली आहे. एसटी कर्मचारी संपावर गेल्याने मुरूड आगाराची प्रवासी वाहतूक सेवा गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांचा खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर मुरूड शहर संघर्ष समितीने येथील एसटी आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश विरकुड, उदय चौलकर, अभिजीत सुभेदार, जाहीद फकजी, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सूर्वे, कुणाल सतविडकर, अरविंद गायकर, शिवसेना शहर अध्यक्ष अशिलकुमार ठाकूर, राजेंद्र मानकर, सुधीर पाटील, सुनिल विरकुड, प्रभाकर मसाल आदी यावेळी उपस्थित होते. पेण व रोहा या आगारातून नियमीत गाड्या सुटत आहेत. मात्र मुरूड आगरातून फक्त पनवेलसाठी एकमेव गाडी सुटते, त्यामुळे मुरूडमधील प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे एसटीच्या विभागीय कार्यालयाकडून किंवा इतर आगारातून (पेण, रोहा, पनवेल) वाहक, चालकांची मदत घेऊन  मुरूड आगाराची वाहतूक व्यवस्था त्वरीत चालू करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

Check Also

Vor die eine Auszahlung denkbar sei, in kraft sein halb wahrscheinlich Umsatzbedingungen

Bares unter anderem Bonusgewinne In welchem ausma? diese Gewinne schenke & amyotrophic lateral sclerosis Bonusgeld …

Leave a Reply