Breaking News

माणगावात पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

माणगाव : प्रतिनिधी

वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे, त्यांचे  उल्लंघन केल्यास आता मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अशी कारवाई आपल्यावर होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार अनिल महाडिक यांनी येथे केले. रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत येथील वाहतूक पोलीस युनिटमार्फत माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये शनिवारी (दि. 12) विद्यार्थ्यांना वाहतूक नियम व दंडाबाबत सहाय्यक पोलीस फौजदार अनिल महाडिक यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. वाहतुकीचे नियम सर्वांनी काटेकोरपणे  पाळल्यास अपघातांचे प्रमाण घटून आपण सुरक्षितरित्या जीवन जगू शकतो, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. हेल्मेटचा वापर करावा, दुचाकीवर ट्रिपल सीट जाऊ नये, वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये, वाहन चालविण्याचा परवाना नेहमी सोबत ठेवावा, वाहतुकीचे नियम प्रत्येकाने समजावून घ्यावेत, रस्ता ओलांडताना  दोन्ही बाजूला पहावे, रस्त्याचा मार्ग बदलताना शक्यतो हात बाहेर काढणे अथवा इंडिकेटर देणे आदी नियम  सर्व विद्यार्थी व वाहन चालकांनी पाळणे गरजेचे असल्याचे सहाय्यक पोलीस फौजदार महाडिक यांनी सांगितले. माणगाव ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य तानाजी ढमाळ, महिला वाहतूक पोलीस विमल ठाकूर यांच्यासह विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply