पनवेल मनपा हद्दीतील कॅन्सरग्रस्त महिलांना मिळणार अर्थसहाय्य

पनवेल : रामप्रहर वृत्त
कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांना व मुला-मुलींना अर्थसहाय्य मिळण्याचा ठराव सोमवारी (दि. 14) झालेल्या पनवेल महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. हा विषय आता येणार्‍या सर्वसाधारण महासभेत मांडण्यात येणार आहे.
महिला व बालकल्याण समितीची बैठक सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त दालनाशेजारील सभागृहात ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या बैठकीस सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सचिव तिलकराज खापर्डे आदी उपस्थित होते.
बदलती जीवनशैली व प्रदुषणामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. कॅन्सर आजाराच्या उपचाराकरिता होणारा खर्चही मोठा असतो. पनवेल महापालिका क्षेत्रातील अशा गरजू लोकांना रुग्णांच्या औषधोपचारासाठी मदत म्हणून अर्थसहाय्य दिल्यास त्यांना आर्थिक संकटातून बाहेर येण्यास मदत होईल या हेतूने हा विषय बैठकीत मांडण्यात आला. या विषयास सर्व सदस्यांनी मंजुरी दिली. यामुळे कॅन्सरग्रस्त महिला व मुला-मुलींना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत होणार आहे. पुढील कार्यवाहीसाठी हा विषय महासभेत मांडण्यात येणार आहे.
याबरोबरच 8 मार्चला साजरा होणार्‍या जागतिक महिला दिनाच्या नियोजनाबद्दल या वेळी चर्चा करण्यात आली तसेच सभापतींनी दिलेल्या इतर विषयांच्या प्रस्तावावर, सदस्यांनी मांडलेल्या विषयांवरही चर्चा झाली.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply