Breaking News

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमधील (सीबीएसई) विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून भारतीय बॉक्स लंगडी संघात उत्तुंग झेप घेतली आणि देशाच्या संघाला आंतरराष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून दिला. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकणारे सिद्धार्थ मिश्रा व ओम झावरे हे विद्यार्थी सहभागी होते. त्यांना क्रीडा शिक्षक सुरज पाटील यांनी मार्गदर्शन केले. ही स्पर्धा नेपाळमधील पोखरा येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये भारत, नेपाळ, श्रीलंका, भूतान या चार देशांचा समावेश होता. यात प्रत्येक देशाचे निवड झालेले 12 खेळाडू त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करीत होते. या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य अर्चना खाडे-चव्हाण, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, ‘रयत’चे जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब कारंडे, क्रीडा शिक्षक सुरज पाटील यांच्यासह पालक उपस्थित होते.

Check Also

सरके चुनर… हटाव मोहीम सफल

गाणं कोणतेही का असेना ते लिहिताना, स्वरबद्ध करताना, त्यावर संगीतसाज चढवताना, त्याचे चित्रीकरण करताना, त्यावरची …

Leave a Reply