Breaking News

व्ही. के. हायस्कूलच्या शतक महोत्सवानिमित्त जनजागृती फेरी

पनवेल ः वार्ताहर

विठोबा खंडप्पा (व्ही. के.) हायस्कूलचा शतक महोत्सव पुढील महिन्यात मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने 22 नोव्हेंबर रोजी आजी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पनवेल शहरातून  जनजागृती फेरी काढली होती. या वेळी त्यांनी शतक महोत्सवी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही केले.

कोएसोच्या पनवेल येथील व्ही. के. हायस्कूलला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने जनजागृती फेरी काढण्यात आली होती. ही फेरी सावरकर चौक, टिळक रोड, जयभारत नाका, कापड बाजार, मिरची गल्ली, शनी मंदिर, पंचरत्न हॉटेल, बिकानेर शॉप, छत्रपती शिवाजी चौक, आदर्श लॉज, लाईन आळी, एसटी स्टँण्ड, नाडकर्णी हॉस्पिटल अशी फिरून पुन्हा शाळेत येऊन तिची सांगता झाली. या फेरीला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply