महाड : प्रतिनिधी
तालुक्यातील बिरवाडीमध्ये एक विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन तरुणांवर महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
पीडित तरुणी मंगळवारी (दि. 15) आपल्या दोन मैत्रीनीं समवेत घरी जात असताना तीन तरुणांनी मोटारसायकल आडवी घालून त्यांना अश्लील भाषा केली. त्याबाबत पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीवरून महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात रोशन विठ्ठल जाधव (वय 20; रा. ढालकाठी), तुषार धोंडीराम यादव (वय 23, रा. तळीये), अक्षय जयराम उतेकर (वय 23, रा. तळीये) या तिघांवर भादवि कलम 354 अ, 354 ड, 34, बाल लैंगिक अत्याचार कलम 7, 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.