उरण : वार्ताहर
भाजप जासई विभागीय अध्यक्ष कै. मेघनाथ म्हात्रे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. 17) प्राथमिक आश्रमशाळा चिरनेर येथील आदिवासी मुलांना आमदार महेश बालदी व उद्योजक पी. पी. खारपाटील यांच्या हस्ते शालोपयोगी वस्तू वाटप व खाऊवाटप करण्यात आले. तसेच भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे आयोजन गोपीनाथ म्हात्रे, नयन घरत व साईराज ग्रुप यांनी केले होते. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, कोप्रोली विभागीय अध्यक्ष शशी पाटील, महालन विभागीय अध्यक्ष महेश कडू, चिरनेर ग्रामपंचायत सदस्य रमेश फोफेरकर, सुशांत पाटील, दिघोडे युवा अध्यक्ष निलेश पाटील, निलेश म्हात्रे, सुनील घरत, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ए. जि. मोरे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर आदी उपस्थित होते.