Breaking News

यंदा मान्सून चांगला बरसणार!

हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
यंदा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या पावसाळ्याच्या चारही महिन्यांत चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अचूक अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला आहे. यंदा पर्जन्यमान चांगले राहिल्याने दुष्काळ पडणार नसल्याचेही भाकित वर्तवण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने या वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ऑस्ट्रेलियाचे हवामान खाते हे त्याच्या अचूक अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय एक्यूवेकर या वेदर कंपनीने भारतात या वर्षी दुष्काळ पडणार नाही, असा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी देशासह राज्यासाठी पावसाळा सुखावणारा होता. देशातील बहुतांश भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली होती. अशातच ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदाच्या वर्षीही वरुणराजाची कृपादृष्टी कायम राहणार आहे. जर ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर बळीराजासाठी ही आनंदाची बातमी असेल.
उष्णतेचा पारा चढला
मुंबई : सध्या हिवाळा संपून उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही उकाडा वाढला आहे.
मुंबईच्या कमाल तापमानात बुधवारी कमालीची वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या सांताक्रूझ वेधशाळेने नोंदवलेले कमाल तापमान 38.2 अंश सेल्सिअस आहे, जे सामान्यपेक्षा 5.4 अंश जास्त होते. शहरातील दिवसाच्या तापमानात 24 तासांत पाच अंशांनी वाढ झाली आहे.
हवामान खात्याने कुलाबा वेधशाळेद्वारे बुधवारी नोंदवण्यात आलेले कमाल तापमान 34.5 अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. हे तापमान एका दिवसापूर्वी नोंदवलेल्या 30.5 अंश सेल्सिअसपेक्षा चार अंशांनी जास्त आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply