Breaking News

ताटातूट झालेल्या माय-लेकरांची भेट; रेल्वे तपासनीसांची सतर्कता

पनवेल : वार्ताहर

रेल्वे तपासनीसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासांतच ताटातुट झालेल्या माय-लेकरांची भेट घडवून आणताच आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले.    नागरकॉईल गांधीधाम ट्रेनने (ट्रेन नं.16336) दोन लहानगी मुले आणि त्यांची आई अलवा ते अहमदाबाद असा प्रवास करीत होते. ट्रेनने चिपळूण रेल्वे स्टेशन सोडले आणि गाडी पनवेलच्या दिशेने धावू लागली. या वेळी गाडीमध्ये रत्नागिरी ते पनवेल असे तिकीट तपासनीस म्हणून कार्यरत असलेले के. के. कापसे व प्रदीप शिर्के आपले काम करीत असताना त्यांना आढळून आले की दोन लहान मुले गाडीत बसले असून ती रडत आहेत. या वेळी त्यांनी मुलांकडे जाऊन त्यांची विचारपूस केली असता चिपळूण येथे गाडी थांबली तेव्हा त्यांना दूध बिस्किट्स खाण्यासाठी आणावी म्हणुन त्या मुलांची आई गाडी मधून उतरून फलाटावर असलेल्या स्टॉल वर गेली, परंतु दरम्यान गाडीने चिपळूण सोडले आणि त्या  मुलांची आई स्टेशन वरच राहिली. या घटनेमुळे ती मुले भांबावून गेली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच तिकीट तपासनीस कापसे यांनी झालेली घटना रेल्वेच्या बेलापूर कंट्रोल रूमशी संपर्क साधून चिपळूण स्टेशन मास्टर कार्यालयात कल्पना दिली. मुलांना धीर देऊन खानपान सेवा नसलेल्या गाडीत स्वतः आणि प्रवाशांच्या मदतीने त्या मुलांची खाण्या-पिण्याची व्यवस्था केली. आणि मुख्य म्हणजे मुलांना धीर  देऊन  त्यांची आई मागच्या ट्रेनने येत आहे आणि पुढल्या स्टेशन वर तुम्हाला ती भेटेल असे सांगुन त्यांना शांत केले. दरम्यान चिपळूण स्टेशन मास्टर यांनी त्या महिलेला मागून येणार्‍या जनशताब्दी (गाडी क्र. 12052) या गाडीत बसवून दिल्याची माहिती कापसे यांना दिला. कापसे आणि शिर्के यांनी याबाबत पनवेल आरपीएफला कळवून त्या बालकांना त्यांच्या स्वाधीन केले. काही तासातच पाठोपाठ जनशताब्दी ट्रेनने आलेल्या त्या मुलांच्या आईच्या ताब्यात ती दोन्ही मुले स्वाधीन करण्यात आली व काही तासाकरिता ताटातूट झालेल्या माय लेकरांची भेट तिकीट तपासनीसांच्या सतर्कतेमुळे घडवून आणली गेली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply